Ratnagiri Rain : परतीच्या पावसाची जिल्ह्यात हजेरी !

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कडक ऊन पडले होते. त्यामुळे घामाने रत्नागिरीकर वैतागले होते. अंगाची लाही लाही होत होती. अखेर मंगळवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठसह विविध ठिकाणी नागरिकांची धावपळ झाली होती. ऐन लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांसह व्यापाऱ्याचा हिरमोड झाला. भात कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. काही भातांचे नुकसान ही झाले. ताडपत्री टाकून उरलेल्या भात पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.

मागील चार महिन्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मागील बुधवारी विजांच्या कडकडाटसह वादळी वाऱ्याने परतीचा पाऊस पडला. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले होते. काही घरांचे पत्रे उडून गेले तर काही दुकानांचे नुकसान झाले होते. संगमेश्वर, लांजा राजापूर दापोली वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रत्नागिरी शहर जिल्ह्यात तापमान वाढले होते. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली. ऑक्टोंबर हिटची जाणीव होत होती. दिवसा ऊन, सायंकाळी उकाडा आणि पहाटे थंडी लागत होती. त्यामुळे रत्नागिरीकर वैतागले होते. अखेर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत एकच धावपळ झाली. त्याचबरोबर नागरिकांनी दुकानात आसरा घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 22/Oct/2025