खेडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची नवीन वसाहत उभी राहणार

खेड : जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहतीसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या नवीन पोलिस कर्मचारी वसाहतीच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे जुनी पोलिस कर्मचारी वसाहत जमीनदोस्त होणार असून, तोडकामाचे काम हाती घेण्यात आले आहे.

ब्रिटिशकालीन पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत अखेरची घटकाच मोजत होती. २० खोल्यांची ही वसाहत पडझडीच्या उंबरठ्यावर होती. यामुळे वसाहतीत एकही पोलिस कर्मचारी वास्तव्यास नव्हता. त्यामुळे नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी ४२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून ५२ अद्ययावत खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षकांसाठीही स्वतंत्र निवासस्थान उभारण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत पोलिस कर्मचारी वसाहतीतील खोल्यांचे छत काढण्यात आले आहे. लवकरच एका बाजूकडील वसाहत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूकडील इमारती पाडल्यानंतर नवीन इमारत उभारणीचे काम सुरू होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:13 PM 23/Oct/2024