Dapoli : दापोलीतील मुख्य मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य

दापोली : शहरातील हिल टॉप परिसरात शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरच सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याने पर्यटकांसह सर्वच दुर्गंधीने हैराण झाले आहेत. खेड-दापोली मुख्य मार्गावर दापोली शहराकडे येणाऱ्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात कचरा साचला असूत, गेले अनेक दिवसांपासून प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तूंचे दोग येथे साचले आहेत.

मंडणगड मार्गे दापोली मध्ये प्रवेश करताना गलिच्छता आणि दुर्गंधीचा कहर झाला आहे. तसेच दापोली दाभोळ मार्गावर जालगाव हद्द संपल्यावर वळणे एमआयडीसीजवळ कचऱ्याचे रस्त्यालगत साम्राज्य आहे. गिम्हवणे हद्द संपताना देखील हीच परिस्थिती आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 22/Oct/2025