Mandangad : मंडणगड मुंडे महाविद्यालयात मेणबत्ती प्रशिक्षण

मंडणगड : शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. अंतर्गत महिला विकास कक्ष व वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीने सुगंधित मेणबत्ती प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते.

यावेळी वनस्पतीशास्त्र व महिला विकास कक्ष विभागप्रमुख डॉ. संगीता घाडगे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, डॉ. विनोदकुमार चव्हाण, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप उपस्थित होते. स्वागत डॉ. संगीता घाडगे, आभार प्रदर्शन डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 22/Oct/2025