संगमेश्वर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील शाळांमध्ये विकसित करण्यात आलेल्या परसबागांची तालुकास्तरीय स्पर्धा झाली. त्यामध्ये असुर्डे-मणवेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.
शालेयस्तरावर सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना विकसित करणे या उद्देशाने परसबाग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी परसबागेत विविध प्रकारचा भाजीपाला व फळझाडे जोमाने वाढवली. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा, असुर्डे मणवेवाडी (प्रथम), हरपुडे नं. २ (द्वितीय), पुर्ये तर्फे देवळे (तृतीय), जि.प. शाळा ओझरे खुर्द, हातीव नं.-१, जिल्हा परिषद शाळा ताम्हाणे (तिन्ही शाळांना प्रोत्साहनपर) यांनी यश मिळवले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 22/Oct/2025














