Ratnagiri : शेतीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १३ लाखांची मदत

रत्नागिरी : जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती-बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी १३ लाख ८६ हजार रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमधील पीक नुकसान अहवालानुसार जिल्ह्यातील ३०७.४१ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे ४६ लाखांचा फटका शेती-बागायतीला बसला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाला. मात्र, काहीवेळा अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. त्याचा फटका सर्वाधिक भात शेतीला बसला आहे. जिल्ह्यातील दोन हजार ५१७ शेतकरी आपत्तीमध्ये बाधित झालेले आहेत. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदतीची रक्कमही प्राप्त झाली आहे. जून २०२५ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी १२ लाख ९६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तर जुलै २०२५ मधील नुकसानीसाठी ९० हजार रुपये प्राप्त झाले आहेत. नुकसानग्रस्तांना वाटप करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 22/Oct/2025