Gogate-Jogalekar College : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला कोकण विभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या महिला व्हॉलीबॉल संघाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला आहे.

दिनांक १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण झोन नं. ४ आणि जी. आय.टी. घरडा इंजिअरिंग महाविद्यालय, लवेल, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कोंकण विभाग नं. ४ मधील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सिद्ध केले आणि सुवर्ण पदकासह सांघिक विजेतेपद प्राप्त केले.

या संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्री. गौरांग कुर्ते आणि श्री. मिनार कुर्ते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग नं. ४ महिला व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ स्पर्धेतील सुवर्ण पदक आणि सांघिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाच्या या यशस्वी महिला संघाचे र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी आणि सेवक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील स्पर्धेसाठी संघास यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सुवर्ण पदक विजेत्या संघात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींची नावेः
१) मधुरा राऊत २) सानिका लिंगायत ३) प्रसिद्धी सोनावणे ४) श्वेता खोडे ५) कृणाली सावंत ६) श्रेया सारंग ७) प्रियंका भोंगले ८) तनिष्का शिरधनकर ९) स्वरा शिंदे १०) कु. श्रावणी शिंदे ११) कु. श्रृजेश्वरी आवळकर १२) नेहा कदम १३) समीक्षा धनवे १४) श्रावणी शेलार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 22/Oct/2025