Khed : घरडा अभियांत्रिकीमध्ये उद्योग-शैक्षणिक संवाद कार्यक्रम

चिपळूण : खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल विभागात इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल आणि स्टुडंटस पायनियर असोसिएशन ऑफ केमिकल इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी उद्योग शैक्षणिक संवाद कार्यक्रम यशस्वी झाला.

शैक्षणिक शिक्षण आणि उद्योग यातील अंतर कमी करण्याच्या हेतूने याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मुंबईच्या मॉन्टेज केमिकल्सचे संस्थापक डॉ. अंकुर चतुर्वेदी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यशस्वी केमिकल इंजिनिअर होण्यासाठी मार्गदर्शन केले. तांत्रिक ज्ञानासोबतच अर्थशास्त्राचे ज्ञानही केमिकल इंजिनिअरसाठी किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले.

विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकास आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या या उपक्रमातून विविध बाबी स्पष्ट झाल्या. अशा संवादांमुळे विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी करण्यास आणि उद्योगाच्या अपेक्षा समजून घेण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 22/Oct/2025