बांबूपासून बनवलेल्या फिटनळीचा खेळ होतोय दुर्मीळ

संगमेश्वर : दीपावलीचा सण जवळ आल्यानंतर पूर्वी बांबूपासून छोट्या आकाराची फिटनळी बनवली जायची. त्यामध्ये चिरफळ टाकून छोट्या दांडीने ते जोरात दाबले की, खणखणीत आवाज यायचा. या आवाजाचा वेध घेऊन अन्य सवंगडी धावत यायचे. दिवाळी सण जवळ आल्यानंतर फिटनळीचा खेळ हमखास बचे ठरलेलाच असायचा. बदलत्या काळात मात्र बांबूची ही बंदूक आता दुर्मीळ झाली आहे.

फिटनळीला ठिकठिकाणी अनेक नावांनी ओळखले जाते. याचा अर्थ गी कोकणाप्रमाणे हा खेळ राज्याच्या विविध भागांत तेवढ्याच आवडीने खेळला जायचा. प्रत्येक भागात याची नावे बदलली आहेत. मात्र, खेळामागील उद्देश मात्र मन रमवणे हा एकच होता. मेपटा, चिपनळी, नपटी, गजनळी, फटुकरी, फटाकरी, फुकणी, निपटी, ह बिटुकली, फोकाटणी, ठासणी अशी अनेक नावे दिली गेली. चिरफळला काही ठिकाणी कटके असे म्हणतात. बालपणीचे हे खेळ आता जवळपास इतिहास जमा झाले आहेत. आधुनिक काळात आलेल्या महागड्या आणि इलेक्ट्रॉनिक खेळण्यांपुढे त्यावेळची मामुली फिटनळी काय उठून दिसणार? कदाचित फिटनळीत सौंदर्य नव्हते; मात्र एकमेकांना साखळीतील दुव्यांप्रमाणे बांधून ठेवण्याची ताकद होती. या फिटनळीतून निघणाऱ्या आवाजाचा वेध घेण्याची नजर आणि शक्ती प्राप्त झाली होती. असे खेळ खेळताना परस्परांत संवाद घडत होता. या संवादातून नातं अधिक बहरत जात होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 22/Oct/2025