रत्नागिरी : अॅग्रिस्टॅक किंवा फार्मर आयडी काढण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्र सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी पुढील पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाडीबीटीच्या योजनांसाठी चुकीची माहिती, खोटी कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या घटकाकरिता लाभार्थ्यांची निवड होईल, त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने घेणे अपेक्षित आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत लाभ न घेतल्यास, अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान परत करावे लागणार असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
काय आहे फार्मर आयडी?
शेतकऱ्यांची ओळख पटवून देणारे एक युनिक डिजिटल ओळख क्रमांक असून, शेतकऱ्यांची एकत्रित माहिती असते.
यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा ?
शासनाच्या विविध योजनांचा लाभघेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र / फार्मर आयडी काढणे आहे. कृषी अनुदान, पीक विमा, खते, बियाण्यांवरील सवलती व कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
अनुदानाचा लाभही वसूल करणार
महाडीबीटीवरील योजनांसाठी जे शेतकरी अर्ज करताना चुकीची, खोटी माहिती सादर करतील, त्यांचा लाभवसूल केला जाणार आहे.
महाडीबीटीवर योजनांसाठी लॉटरी पद्धत बंद
महाडीबीटीवरील विविध योजनांसाठी आता लॉटरी पद्धत बंद केली असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे.
खोटी माहिती दिल्यास ५ वर्षे आयडी ब्लॉक
शासकीय योजना, अनुदानाचा लाभमिळविण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्यास लाभार्थी शेतकऱ्यांचा आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 22/Oct/2025














