Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा सन्मान

Olympic Medallist Javelin Thrower Neeraj Chopra Honorary Rank Of Lieutenant Colonel : जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दोन हंगामात भारताला पदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भारताच्या गोल्डन बॉयला बुधवारी भारतीय लष्करातील मानद लेफ्टिनंट कर्नल पद देण्यात आले. दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत नीरज चोप्राला लष्करातील नवी रँक देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळणारा नीरज चोप्रा हा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.

नायब सुभेदार रँकसह ते लेफ्टनंट कर्नल!

‘द गॅझेट ऑफ इंडिया’ (सरकारी माहिती पत्र) नुसार, नीरज चोप्राची ही नियुक्ती १६ एप्रिल पासून प्रभावी झाली. २६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या रुपात नायब सुभेदार रँकसह त्याचा लष्करातील प्रवास सुरु झाला होता. २०२० मध्ये पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यावर २०२१ मध्ये नीरज चोप्रा सुभेदार पदावर बढती देण्यात आली होती. याशिवाय त्याला उत्कृष्ट सेवेसाठी खेलरत्न आणि विशिष्ट सेवा पदकासह सन्मानित करण्यात आले आहे. आता तो लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहचला आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठी संधी हुकली

दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील आपल्या जेतेपदाचा बचाव करण्यात अपयशी ठरला होता. या स्पर्धेतील गत चॅम्पियन असलेल्या नीरज चोप्राला सलग दोन वेळा जेतेपदासह नवा इतिहास रचण्याची संधी होती. पण यंदाच्या स्पर्धेत ८४.०३ मीटर भाला फेकीसह त्याला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 22-10-2025