Khed : राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रितेश जाधवला रौप्य पदक

खेड : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी रितेश संजय जाधव याने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली.

रितेशच्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, शाळेचे चेअरमन राजेश बुटाला, प्रभारी मुख्याध्यापक विजय मस्के, पर्यवेक्षक उत्तम कांबळे, ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड, क्रीडा शिक्षक शिवाजी लवटे, सत्यवान धोत्रे, समीर जाधव तसेच संपूर्ण सहजीवन परिवार आणि शाळेच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 22/Oct/2025