दापोली : टाळसुरे गावात फटाकेबंदीचा निर्णय

दापोली : तालुक्यातील टाळसुरे गावाने दिवाळीमध्ये कोणीही फटाके वाजवायचे नाहीत, असा निर्णय घेतला आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय गावाने घेतला आहे.

दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीत नवे कपडे, फराळची रेलचेल असते. जोडीला असते ती फटाक्यांची आतषबाजी. फटाक्यांमुळे क्षणिक आनंद मिळतो, मात्र त्यातून ध्वनिप्रदूषण, हवा प्रदूषण होते. ते रोखण्यासाठी टाळसुरे गावाने फटाकेबंदीचा एकमुखी निर्णय घेतला. वाढते प्रदूषण, तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर गावाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. टाळसुरे ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा ०.५’ मोहीम यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेंतर्गत जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत फटाकेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 PM 23/Oct/2024