Chiplun : नांदिवसे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

चिपळूण : तालुक्यातील नांदिवसे येथील निर्मल ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार निकम म्हणाले की, ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू असून नूतन इमारतीमुळे गावकारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल. या ठिकाणी ग्रामस्थांसाठी उत्तम सुविधा निर्माण होतील व सर्वसामान्यांच्या अडचणीसोडवण्यात वेग येईल.

माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावात अनेक कामे आपण केल्याचे सांगितले. या कार्यक्रमास अशोक कदम, निहार कोवळे, दिनेश शिंदे, सरपंच सायली शिंदे, उपतालुका प्रमुख संजय गणवे जयवंत शिंदे, रमेश शिंदे, रमेश शिंदे, दयानंद शिंदे, नीता पाड्याळ, नरसिंगराव शिंदे, शशिकांत शिंदे, वैदही शिंदे, वैशाली मोडक, ग्रा.पं. कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 23-Oct-25