पावस : यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूमधील १ असे एकूण बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले. या किल्ल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तालुक्यातील नाखरे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे.
मीना राजू मंचाचे विद्यार्थी स्वरूप मेस्त्री, हर्षद लांजेकर, साहिल पाष्टे, अथर्व जाधव, दुर्वेश जाधव, सिहान जाधव, यश लिंगायत, अरुष शिंदे, मानस मुंगणेकर, हर्ष लांजेकर, सार्थक गुरव, सर्वेश गुरव, ओम गुरव, समर्थ भरणकर, भावेश हरमले, संस्कृती पावसकर, योगिनी शिंदे, क्षीतिजा सोमेस्कर यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला.
युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष या हेतूने जागतिक वास्तू म्हणून बारा दुर्गांना प्रमाणित केले आहे. त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत गिनीज बुक रेकॉर्डसाठी प्रयत्न करत आहे. लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या अशा पहिल्याच विश्वविक्रमात आपल्या शाळेचा खारीचा वाटा असावा, या हेतूने विद्यार्थ्यांना दुर्ग वनवण्यास प्रोत्साहन दिल्याची प्रतिक्रिया उपक्रमप्रमुख पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांनी दिली.
दरम्यान, याच उपक्रमाचा भाग म्हणून शाळेत प्रत्येक वर्गखोलीला दुर्गाचे नामाभिधान करण्याचे नियोजन असल्याचे तसेच जागतिक वारसा प्राप्त किल्ल्याचीच प्रतिकृती घरी बनवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे अभिनंदन पत्र अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्राप्त करण्यासाठी नियोजन केले असल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे यांनी सांगितले.
डिजिटल फ्लेक्सच्या माध्यमातून दुर्गाबद्दल अधिकची माहिती देऊन विद्यार्थ्यांत दुर्गवीर बनण्यासाठी उत्सुकता निर्माण करणारे नाखरे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच अंगणवाडी सेविका मंगला चव्हाण, मदतनीस योगीता शिंदे, अपेक्षा नार्वेकर, स्वयंपाकी पूजा धुळप, मनीषा धुळप आणि पालकवर्ग यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास लांजेकर, उपसरपंच विजय चव्हाण, सरपंच विद्या जाधव, केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय सोपनूर यांनी विशेष कौतुक केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार*
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 23-Oct-25














