दापोली : एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील पोफळवणे गावात पोषण महिना उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा उद्देश गर्भवती माता, स्तनदा माता, लहान बालके व किशोरवयीन मुलींमध्ये पोषणविषयक जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका तसेच गावातील महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
विविध पोषणयुक्त आहाराचे महत्त्व, बालकांचे वजन व उंची मोजणी, योग्य आहार योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक स्तरावर तयार केलेल्या पोषण आहाराचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच दत्ताराम मोरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी पदाधिकारी, ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 23-Oct-25














