पावस : महाराष्ट्र शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीने प्रवास मोफत केला आहे; मात्र या वयोगटातील प्रवाशांची संख्या कमी आहे.
शारीरिक अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे, उतरणे कठीण जाते. तसेच त्यांना एसटीने प्रवास करण्यास कुटुंबही नकार देतात. त्यामुळे ६५ वर्षापासून वयोगटांतील ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.
आर्थिक अडचणीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करता येत नाही. या समस्येचा सारासार विचार करून शासनाने या वयोगटातील नागरिकांनाही मोफत प्रवास योजनेत सहभागी करून घ्यावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:51 23-10-2024














