पाली : सर्व शाळांमध्ये दीपावलीत दुर्गोत्सव आयोजित करून गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचे महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जि.प.पुर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर शाळा पाली क्र.१ मध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती साकारली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा उद्देश केवळ बौद्धिक विकास नसून त्याचबरोबर चारित्र्य निर्माण आणि एकविसाव्या शतकातील मुख्य कौशल्ययुक्त संपूर्ण व सर्वांगीण विकसित व्यक्ती निर्मिती असेल हा आहे. शाळांमधील विद्यार्थी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमात सहभागी व्हावेत, विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि सर्जनशीलता यांना उमलण्याची संधी मिळावी या उद्देशाने कलाकार्यानुभव अंतर्गत आकाश कंदील, पणत्या रंगविणे, भेट कार्ड बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
मुख्याध्यापक जनार्दन मोहिते यांच्या संकल्पनेतून पदवीधर उपशिक्षक ममता सावंत, मारुती घोरपडे, श्रद्धा रसाळ, श्रुती वारंग, प्रमिला मावळणकर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी उपक्रम केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे यांनी किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यासाठी सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 23-Oct-25














