चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) पक्षाची उमरोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये उमरोली जिल्हा परिषद गटातील येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा झाली.जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सर्वसाधारण असल्याने निलेश अनंत चव्हाण, प्रकाश श्रीपत साळवी हे इच्छुक आहेत. उमरोली जिल्हा परिषद गटातील उमरोली पंचायत समिती गणासाठी आरक्षण सर्वसाधारण असल्याने महेश शिवराम कातकर, प्रकाश श्रीपत साळवी इच्छुक आहेत. उमरोली जिल्हा परिषद गटातील गुढे पंचायत समिती गणासाठी आरक्षण ओबीसी महिला असल्याने सायली संतोष बंगाल, उमरोली जिल्हा परिषद गट अध्यक्ष म्हणून विक्रम साळुंखे यांचे नाव सुचवण्यात आले आहे.
गुढे पंचायत समिती गणाचे अध्यक्ष म्हणून किशोर गांधी यांचे नाव सुचवण्यात आले. गुढे पंचायत समिती गण उपाध्यक्ष म्हणून शशिकांत कामेरकर, उमरोली पंचायत समिती गणाचे अध्यक्ष म्हणून गणेश चव्हाण यांचे नाव सुचवण्यात आले. उमरोली पंचायत समिती गणाचे उपाध्यक्ष म्हणून केशव जाधव यांचं नाव सुचवण्यात आलं तरी अशा तन्हेने उमरोली जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाची बैठक संपन्न झाली. त्यावेळेस प्रमुख कार्यकर्ते म्हणून नंदू सावंत, प्रकाश साळवी, महेश कातकर, विक्रम साळुंखे, गणेश गांधी, किशोर गांधी, दाजी पडवेकर, उमेश जाधव, संजय धामापूरकर, जीवन पवार, सुशील पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 23-Oct-25














