चिपळूण : कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र विभाग अणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या करिअर कट्टा या विभागामार्फत सुरू असलेल्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी (डिवायएसपी) प्रकाश बेळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात डीवायएसपी प्रकाश बेले यांनी पोलीस सेवेत प्रवेशासाठी आवश्यक शारीरिक क्षमता, मानसिक स्थैर्य आणि बौद्धिक तयारी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यांनी प्रशिक्षणार्थीना नियमित व्यायाम, शिस्त, आत्मविश्वास व वेळेचे नियोजन या गुणांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. तसेच भरती प्रक्रियेत होणाऱ्या लेखी व शारीरिक चाचण्यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमा दरम्यान करिअर कट्टा विभागामार्फत पोलीस भरतीच्या सर्व प्रशिक्षणार्थीना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यां मध्ये उत्साह व एकजुटीची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे आयोजन करिअर कट्टा विभाग प्रमुख प्रा. जयसिंग चवरे यांनी केले. प्राचार्य टी. वाय. कांबळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग आणि सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयसिंग चवरे यानी व आभार डॉ. दीप्ती शेंबेकर यानी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:03 PM 23-Oct-25














