गावखडी : जवाहर नवोदय विद्यालया मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कु. जय प्रणोती राजेंद्र रांगणकर याने सुयश मिळवले असून त्याची निवड पडवे ता. राजापूर जि. रत्नागिरी या विद्यालयात झाली आहे. जय हा पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी या शाळेचा विद्यार्थी असून त्याच्या यशात या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याला त्याचे वडील श्री राजेंद्र रांगणकर (प्राथमिक शिक्षक) आई प्रणोती रांगणकर, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांचा भक्कम पाठिबा लाभला. त्याच्या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:57 PM 23-Oct-25














