विठ्ठलवाडी गणेश मंडळाने साजरी केली आदिवासी पाड्यावर दिवाळी

चिपळूण : खेर्डीतील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाने दहावे वर्ष साजरे करत आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली. मंडळाच्या मार्गदर्शक श्री. दशरथ शेठ दाभोळकर यांच्या प्रेरणेने आणि अध्यक्ष शशांक भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली, विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाने आदिवासी पाड्यावर जाऊन दिवाळीचा फराळ, कपडे, भांडी आणि इतर गृह उपयोगी वस्तूंचे वाटप बुधवार दिनांक 22/10/2026 रोजी आनंदात केले.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. कुंभार्ली येथील कातकरी पाड्यावर 15 ते 20 घरांना विविध मदतीचे वाटप करण्यात आले. विठ्ठलवाडी गणेश मंडळ ही खेर्डीतील एक सेवाभावी संस्था असून, दरवर्षी लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवते. यंदाच्या वर्षीही मंडळाने आपल्या सामाजिक बांधिलकीतून गरजू लोकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

सदर उपक्रमासाठी मंडळाचे आधारस्तंभ श्री. दशरथ शेठ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शशांक भिंगारे, सल्लागार संभाजी दाभोळकर, माजी उपाध्यक्ष श्री. अजित वाडकर, खजिनदार शरद पवार, श्री. दत्तात्रय (बाळू) कदम, श्री. संदीप सुर्वे, श्री. राकेश दाभोळकर, श्री. संभाजी यादव, वैभव महाडिक, अभिजीत यादव, पिंट्या यादव, वैभव गुरव, विकास पवार, दिनेश माटे, सम्राट भोसले, युवराज कवडे, जयेश वाडकर, जयंत वाडकर, पवन पवार, साईराज वाडकर, हर्ष वाडकर, सोमराज वाडकर, हणमंत भोयर, सुजल वाडकर, निखिल वाडकर, सुमित पवार, राजवर्धन यादव, समर्थ यादव, सार्थक पवार, अमेध दाभोळकर, अर्चीता दाभोळकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 24-Oct-25