रत्नागिरी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या वास्तव्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या संगमेश्वर कसबा येथील ऐतिहासिक ‘सरदेसाईचा वाडा’ परिसराची स्वच्छता मोहीम ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि.)’ ने यशस्वीपणे पार पाडली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या नेतृत्वाखाली १९ ऑक्टोबर २०२५ रोजी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाडा परिसरातील छोटे गवत, झाडे-झुडपे, वेली, तसेच प्लास्टिकच्या बाटल्या व कचरा हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ही संस्था गेली ११ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासह तालुका स्तरावर सातत्याने कार्यरत आहे. किल्ले संवर्धन, स्वच्छता मोहीम, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य शिबिरे, धार्मिक स्थळे आणि प्राचीन मंदिरांच्या परिसराची स्वच्छता अशा विविध क्षेत्रांत प्रतिष्ठानने मोलाचे योगदान दिले आहे.
या स्वच्छता मोहिमेला यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये सचिव समीर गोताड, संघटक समीर धावडे, महिला संघटक प्रतिक्षा शिगवण, कार्याध्यक्ष नितीन रोडे, सल्लागार मोहन पवार, सदस्य संदेश धावडे, विजय धावडे, सचिन धावडे, प्रकाश गोताड, पूजा मेस्त्री, प्रतिक्षा पुराणिक, अमन आग्रे, समर्थ रोडे, संतोष कुळ्ये यांचा समावेश होता. याचबरोबर, कसबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा लाने यांचेही या मोहिमेला विशेष मोलाचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 24-Oct-25














