Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी येथील मुख्य वसाहती जवळील पुलाच्या बाजूला एक कार रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर कारची नंबर प्लेट गायब असल्याने अपघात की घातपात? याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

स्थानिक नागरिकांना पुलानजीक चिखलात अडकलेली कार झाडीत दिसली.
जवळ जाऊन पाहिल्यानंतर वाहनाच्या आतील भागात आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले.

दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहनाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
कारची नंबर प्लेट गायब असल्याने वाहन नेमके कोणाचे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, आत कोणीही व्यक्ती आढळली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 24-10-2025














