Dapoli Harne Beach : हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी

दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्रकिनार्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार पुन्हा उघड झालाआहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले असून ते खास समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले आहेत मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

हर्णे येथील समुद्रकिनार्यावर आपली वाहने नेवून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार आज उघड झाला आहे. पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना समुद्राच्या भारती ओहोटीचे वेळापत्रक माहित नसल्याने समुद्रकिनारी नेलेली वाहने भरतीच्या पाण्याने किनारीच रुतून बसल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अनेक पर्यटक समुद्रकिनारी वेगाने वाहने चालवून स्टंट करत असल्याने किनाऱ्यावरील इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो व अपघाताचा धोकाही संभवतो त्यामुळे जिल्हा पोलीस दलाने समुद्रकिनारी वाहने नेल्यास मनाई केली होती. मात्र त्याकडेही हे पर्यटक दुर्लक्ष करत असल्याने आता स्थानिक पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:31 PM 24-Oct-25