ग्रामपंचायत ही विकासाचा केंद्रबिंदू : आमदार शेखर निकम

अडरे : ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू आहे. नूतन इमारतीमुळे गावकारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल. या ठिकाणी ग्रामस्थांसाठी उत्तम सुविधा निर्माण होतील आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात वेग येईल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.

चिपळूण तालुक्यातील नांदिवसे येथील निर्मल ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्याला अशोक कदम, निहार कोवळे, दिनेश शिंदे, सरपंच सायली शिंदे, उपतालुकाप्रमुख संजय गणवे, ज्येष्ठ नागरिक जयवंत शिंदे, रमेश शिंदे, भरत शिंदे, रमेश शिंदे, दयानंद शिंदे, नीता पाड्याळ, नरसिंगराव शिंदे, शशिकांत शिंदे, शंकर शिंदे, प्रकाश शिंदे, श्रीकांत शिंदे, सुनील शिंदे, वैदही शिंदे, अशोक कदम, अनिकेत शिंदे, वैशाली मोडक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:44 PM 24-Oct-25