Devrukh : लग्न जमत नसल्याने तरुणाची गळफासाने आत्महत्या

देवरूख : विवाह होत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे २५ रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मकरंद कृष्णा पाल्ये (वय ३२) असे या घटनेतील आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मकरंद पाल्ये याला दारूचे व्यसन होते. त्याच्या अपंगत्वामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते, या गोष्टीचे त्याला प्रचंड नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच मकरंद याने सकाळी घराच्या खोलीतील लोखंडी चॅनलला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेची खबर मृत तरुणाचे शेजारी राहणारे अवधूत सुभाष सालीम यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 27/Oct/2025