Ganpatipule : गणपतीपुळेत वॉटर स्पोर्ट व्यवसाय संकटात

गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट व्यवसाय सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन गजबजलेल्या दिवाळी पर्यटन हंगामात अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

सध्या या वादळ सदृश्य परिस्थितीमुळे गणपतीपुळे समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात खवळला असून समुद्राच्या पाण्याला मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या चार दिवसांत समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत या बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचे आणि विशेषतः समुद्राच्या पाण्याबाहेर काढण्याचे काम येथील वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांकडून केले जाते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वॉटर स्पोर्ट व्यवसाय बंद असल्यामुळे बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी अखेर जीवरक्षक आणि पोलिस यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. गणपतीपुळे समुद्राचे पाणी सध्या किनाऱ्यावर धडकत असून मोठ-मोठ्या लाटा उसळी घेत आहेत. त्यामुळे देखील वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांना आपले जलक्रीडाप्रकार बंद ठेवण्याची पंचायत निर्माण झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 27/Oct/2025