ST BUS : खेड आगाराच्या ४० ग्रामीण बसफेऱ्या ४ नोव्हेंबरपर्यंत रद्द

खेड : खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात धावणाऱ्या ४० बसफेऱ्या ४ नोव्हेंबरपर्यंत रह करण्यात आल्या आहेत. खेड आगारातून विशेष बससेवेसह पंढरपूर यात्रेसाठी बसफेऱ्या रवाना होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना १४ दिवस मोठा फटका बसणार आहे.

बसफेऱ्यांमध्ये खेड-कोणडिवली, खेड-आयनी, खेड-वाडीजैतापूर, खेड शेरवली, खेड-बिजघर, खेड-तुळशी, खेड दयाळ, खेड-वावे हॉस्पिटल, खेड-मंडणगड, खेड-शिरगाव, खेड-पन्हाळजे, खेड-करोडी, खेड-माणी, खेड-किंजळेतर्फे नातू खेड पांगारी, खेड-मौजेजैतापूर, खेड-वाक्षेपवाडी, खेड-संगलट, खेड-वडगाव, खेड-बिरमणी, खेड-शेल्डी, खेड-तिसंगी, खेड-रसाळगड तसेच खेड-जामगे आदी बसफेऱ्यांचा समावेश आहे.

गाडया पंढरपूरसाठी रवाना होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. किल्लेमाची, खेड रूखी, खेड-शिवतर, खेड-आस्तान, खेड पोफळवणे, खेड-झोळीचीवाडी, खेड-सुकदर,खेड-आष्टी, खेड-पोयनार, खेड-कुंभाड व्हाया तिसंगी, खेड-घोगरे व्हाया वाडीजैतापूर, खेड-शिरगाव व्हाया बिजभर, खेड-अणसपुरे, बसफेऱ्यांचाही समावेश आहे.ऐन सणात रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होणार असून, आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 27/Oct/2025