गावतळे : दापोली तालुक्यात साखळोली येथे २३ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता दोन घरांवर वीज पडून नुकसान झाले. या घटनेबाबत डॉ. राजकुमार बर्वे यांनी माहिती दिली. रामकृष्ण बर्वे आणि राजकुमार बर्वे, शेजारील चंद्रशेखर करमरकर यांच्या घरांवर सायंकाळी सात वाजता वीज पडली.
घरातील मीटरजवळ वीज कोसळली आणि क्षणात मीटर आणि वायरिंगने पेट घेतला. त्या खाली असलेली खुर्ची आणि बेड यांनीही पेट घेतला. घरातील मंडळी त्या वेळी अंगणात होती. वीज पडून आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व मंडळी घरात धावली आणि आग आटोक्यात आणली. शेजारील करमरकर यांचे घर बंद होते. ते उघडून आत जाऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
दापोली तालुक्यात दोनच दिवसांपूर्वी जालगाव येथे वीज पडल्यामुळे सहा नागरिकांचे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पोलिसपाटील सुनील सोनू गौरत, उपसरपंच दिनेश भागोजी जाधव, माजी उपसरपंच अनिल विश्राम शिंदे, संदीप चंद्रकांत गोरिवले, मंगेश गोरिवले, प्रमोद बुरटे व अन्य ग्रामस्थांच्या मदतीने तत्परतेने आग आटोक्यात आणली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 27/Oct/2025












