रत्नागिरी : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातर्फे २७ ते २ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निर्मूलन जनजागृती कालावधीत रत्नागिरी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील ग्रामपंचायत, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना येथे भ्रष्टाचार निर्मूलन बैठका, शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, चर्चासत्र, निबंध स्पर्धा, पथनाट्य, योगावर्ग, व्यायामशाळा व ज्येष्ठ नागरिक यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अविनाश पाटील यांनी केले आहे. तसेच कोणीही शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी लाच रकमेची मागणी करत असल्यास कार्यालयाचा ई-मेल आयडी acbratnagiri@gmail. com या संकेतस्थळावर अथवा टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच कार्यालयीन फोन नंबरवर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 27/Oct/2025












