दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडलेल्या भारतीय हम्पबॅक डॉल्फिनला रविवारी (ता. २६) सकाळी साडेआठच्या सुमारास वाळूमध्ये जेसीबीच्या साहाय्याने खड्डा काढून पुरण्यात आले.
शनिवारी (ता. २५) सकाळी भरतीच्या पाण्याने हा डॉल्फिन वाहून किनाऱ्यावर आला होता. येथील स्थानिक मुझम्मील काझी यांना तो दिसून येताच त्यांनी वनविभाग व कांदळवन विभागाला माहिती दिली. परंतु, शनिवारी उशिरापर्यंत दिवाळीच्या सुट्टीमुळे कोणीही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
त्याची जखम प्रचंड चिघळली होती. त्यामुळे त्याच्यावर पुढील कार्यवाही तातडीने होणे आवश्यक होते. शनिवारी येथील स्थानिकांनी या परिक्षेत्रातील सर्वच अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दूरध्वनी वरून संपर्क करून कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. अखेर कांदळवन खात्याचे जिल्ह्याचे अधिकारी किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हर्णै कांदळवन समितीचे अध्यक्ष फहद जमादार यांनी रविवारी सकाळी जेसीबी मागवला व किनारपट्टीवरच वाळूमध्येच मोठा खड्डा काढून या डॉल्फिनला पुरण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 27/Oct/2025














