Dapoli : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली!

दापोली : दापोलीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपासून शहरासह ग्रामीण भागात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र काळजीच्या रेघा उमटल्या आहेत.

तालुक्यात भातकापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकरी पिके कापून खळ्यात सुकवण्याच्या तयारीत असतानाच हा अवेळी पाऊस कोसळल्याने धान्य ओली होण्याची शक्यता वाढली आहे. पावसामुळे शेतात उभ्या पिकांना पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला असून, काही भागांत ओलसरतेमुळे झुडपात पडलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘असाच पाऊस पुढेही चालू राहिला तर मेहनतीचं सोनं वाया जाण्याची भीती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 27/Oct/2025