रत्नागिरी : ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा या राज्यशाखेच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर देण्यात आले. रत्नागिरीत उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे मागण्यांचे निवेदन रत्नागिरी तालुका तेली समाजसेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
ओबीसींच्या विरोधात शासननिर्णय घेत असल्याविरोधात हे निवेदन मुख्यमंत्री व ओबीसी उपसमितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यासाठी देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, खजिनदार दिनेश नाचणकर, शहराध्यक्ष अमोल लांजेकर, अशोक भाटकर, सुरेंद्र घुडे, यशवंत डोर्लेकर, स्वप्नील सकपाळ, प्रकाश नार्वेकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 27/Oct/2025












