Ratnagiri : रत्नागिरीत राष्ट्रीय छात्र सेना प्रि-मेन्यू २०२६ शिबिर सुरू

रत्नागिरी : महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीच्या वतीने आयोजित प्रि-मेन्यू २०२६ शिबिर रत्नागिरी येथे २४ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. हे शिबिर २ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. हे शिबिर रत्नागिरी ते विजयदुर्ग दरम्यान होणाऱ्या मेन्यू सेलिंग मोहिमेची पूर्वतयारी म्हणून आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले एनसीसी कॅडेट्स या शिबिरात सहभागी झाले आहेत. शिबिरात जलतरण कौशल्य चाचणी, व्हेलर पुलिंग, सेलिंगचे प्रत्यक्ष प्रशिक्षण भाटये समुद्रकिनारी दिले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 27/Oct/2025