Chiplun Railway Station Road : चिपळूण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याला झाडाझुडपांचा वेढा

चिपळूण : शहरातून वालोपे रेल्वेस्टेशनकडे (चिपळूण) जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मुंबईला जाणारे अथवा चिपळूणला येणारे प्रवासी मुख्यत्वे गांधारेश्वर पूल मार्गे आणि पेठमाप साईनाका मार्गे रेल्वे स्टेशनकडे जातात. मात्र या मार्गावर झाडेझुडपे वाढल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

पेठमापकडे जाणारा स्टेशन लगतचा रस्ता अरुंद असून याच मार्गान मिरजोळी, कोंढे, शिरळ आदी ग्रामीण भागातील नागरिक ये-जा करतात. आता या रस्त्याच्या कडेने झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे चारचाकी वाहने समोरासमोर आल्यास त्यांना पासिंग करणेही अवघड होत आहे. चिपळूण रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून मोठी वर्दळ असते. अशा स्थितीत या भागातील रस्ता अरुंद व झाडेझुडपांनी वेढला असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

या रस्त्याचे रुंदीकरण तसेच काँक्रिटीकरण करावे अशी मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. रस्त्यालगतची झाडेझुडपे तोडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणीही आता प्रवासी वर्गातून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 27/Oct/2025