Khed : उधळे गावामध्ये अनोखी भाऊबीज

खेड : दिवाळी म्हणजे आनंद, आपुलकी आणि प्रेमाचा सण. यानिमित्त तालुक्यातील उधळे गावात एक वेगळीच दिवाळी साजरी झाली आहे. दुबईस्थित उद्योगपती बशीरभाई हजवानी यांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा आणि मानवतेचा संदेश देत तब्बल १६०० हिंदू बहिणींना भाऊबीज दिली.

पंचक्रोशीतील १६०० महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि भाऊबीज साजरी करत बंधुत्वाचा उत्सव केला. कोकणातील लोकांसाठी आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. पुढील काळात उधळे आणि परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य विमा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे हजवानी यांनी सांगितले. बशीरभाई हजवानी है गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये सक्रिय असून, त्यांचा हा उपक्रम समाजात सौहार्द, एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा ठरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 27/Oct/2025