रत्नागिरी : पावसासोबत असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे मच्छीमार नौकांना गेल्या तीन दिवसांपासून मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मासळीचे दर खवय्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने रविवारी चिकन दुकानांमध्ये गर्दी, तर मासळी मार्केटमध्ये शुकशुकाट होता.
समुद्रात आणि समुद्राबाहेर गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत असून सोबत जोरदार वारेही वाहत आहेत. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकांना अपेक्षेप्रमाणे मासळी मिळालेली नाही. त्यामुळे मासळीचे दर फारच वाढलेले होते.
मिरकवाडा बंदरावर ६० ते ८० रुपये दराने मिळणारा बांगडा १८० रुपये ते २०० रु. दराने विकला जात होता. सरंग्याचे दरसुद्धा वधारलेलेच होते. ७०० ते ८०० रुपये किलो दराने सरंगा विकला जात होता. ५० ते ६० रुपये दराने मिळणारी मांदेली १२० रुपये, तर ओले बोंबील २५० रु. किलो दराने विकले जात होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:35 PM 27/Oct/2025














