रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१० वा. सुमारास करण्यात आली. दीपक यशवंत सुतार (वय ६४, रा. पड्यारवाडी गावखडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वृद्धाचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबक सोमा मौळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा शनिवारी दुपारी गावखडी समुद्रकिनारी सुरुबनातील झाडाच्या आडोशाला मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 27/Oct/2025














