BSNL : कोंडगाव, साखरपामध्ये बीएसएनएल सेवा ठप्प

संगमेश्वर : तालुक्यातील कोंडगाव व साखरपा परिसरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा गेले आठ दिवस ठप्प आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ऑनलाईन कामे खोळंबली. यामध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

चार किलोमीटरच्या परिसरात ही सेवा बंद असून, मुर्शीच्या पुढे व भोवडेच्या पुढे व दाभोळे या ठिकाणी ही सेवा चालू आहे; मात्र कोंडगाव बाजारपेठेत व साखरपा परिसरात इंटरनेट सेवा बंद असून, याकडे संबंधित खाते दुर्लक्ष करीत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 27/Oct/2025