रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील मुरडे येथील चढावात रिक्षा बंद पडून मागे येताना रिक्षामधील तीन महिलांनी बाहेर उड्या मारल्याने त्यांना दुखापत झाली. उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
साक्षी नितीन गुरव (वय २१), रूपाली कमलाकर गुरव (२५) आणि दीक्षा बबन गुरव (सर्व रा. देवरुख सोळजाईवाडी, रत्नागिरी) अशी या अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी रिक्षा चालक बबन गुरव (रा. देवरुख सोळजाईवाडी, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०८-व्ही- २१७६) मधून साक्षी, रूपाली आणि त्याची बहीण दीक्षा या तिघींना बसवून मुरडे ते देवरुख असा येत होता.
मुरडे येथील चढावात आला असता रिक्षा अचानकपणे बंद पडून मागे-मागे येऊ लागली. त्यामुळे घाबरलेल्या तिन्ही महिलांनी रिक्षामधून बाहेर उड्या मारल्या. यात त्यांना दुखापत झाल्यामुळे प्रथम देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात रिक्षा मागे येऊन रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्यामुळे तिचेही नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 27/Oct/2025












