Ganpatipule : गणपतीपुळे समुद्रात बुडताना चिमुकल्याला वाचवले; वडील बेपत्ता

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सध्या पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. त्यामध्ये अनेक पर्यटक देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटताना समुद्रात आंघोळीसाठी उतरत आहेत. अशांपैकीच रायगडमधून पेणमधून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेले कुटुंब समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना
यातील अयांश नितीन पवार (वय अडीच वर्षे) याला स्थानिक फोटोग्राफी व्यावसायिक रोहित चव्हाण यांनी प्रसंगावधान व तत्परता दाखवून समुद्रात उडी घेऊन वाचवले तर अयांशचे वडील मात्र खोल समुद्रात वेपत्ता झाले आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार शनिवारी येथील समुद्रामध्ये सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पेण-रायगड येथी कुटुंब समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले असताना हा अपघात घडला. यामध्ये अयांश नितीन पवार तसेच वडील नितीन शंकर पवार (३५, रा. हमरापूर पेण, जि. रायगड) हे पिता-पुत्र बुडत असल्याचे लक्षात आले.

यावेळी मुलगा अयांशला फोटोग्राफर रोहित चव्हाण यांनी वाचविले तर वडील नितीन शंकर पवार हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. जीवरक्षक, गणपतीपुळे व्यावसायिक ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी शोध घेत आहेत. या घटनेतून अयांश याला वाचवल्यानंतर पर्यटनासाठी आलेल्या डॉ. प्रणाली भरदारे भिवशी निपाणी यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व गणपतीपुळे येथील खासगी रिक्षाने ताबडतोब मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देण्यात आले येथील वैद्यकीय अधिकारी पवार यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर करण्याचे काम केले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या बाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 27/Oct/2025