Khed Railway Station : खेड रेल्वे स्थानकावर होमगार्ड जवानांनी वाचवला प्रवाशाचा जीव !

खेड : खेड रेल्वे स्थानकावर रात्रपाळीला बंदोबस्तासाठी असताना होमगार्ड जवानांनी दाखवलेल्या तत्परता आणि धाडसामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. मडगाव-एलटीटी हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा पाय घसरला.

तो ट्रेनखाली जाण्याच्या अवस्थेत असतानाच खेड होमगार्ड पथकाचे होम/२५७चव्हाण, होम/१६१६ सुर्वे, होम/१६१९ मोरे तसेच मंडणगड पथकाचे होम/२३०४ दुर्गवळे आणि होम/२३०८ वैकर या जवानांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ धाव घेत प्रवाशाला ओढून बाहेर काढले. होमगार्ड जवानांच्या चपळाईमुळे एक मोठा अपघात टळला. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल खेड जीआरपी आउट पोस्टचे प्रभारी ननावरे यांनी या होमगार्ड जवानांची प्रशंसा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 27/Oct/2025