रत्नागिरी : पश्चिम किनारपट्टीवर समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारपट्टीवरील हवामानत बदल झाला असून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
गेले दोन दिवसांपासून किनारपट्टीवरील हवामानात बदल झाला आहे. तापमानाचा काटा घसरला असून थंड वारे वेगाने वाहत आहेत. दोन दिवस पावसाच्या काही सरी सुद्धा कोसळत होत्या. आज वाऱ्याच्या वेग प्रचंड वाढलेला असून बोटी किनाऱ्यावर लागलेल्या आहेत. तापमान घसरले असून सध्या सोमवारी दुपारी रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या गावात जोरदार पाऊस पडत आहे. दिवाळीनंतर सुद्धा पाऊस पडत असल्याने दैनंदिन जीवनमानावर याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 27/Oct/2025












