Dapoli- Khed Road : दापोली-खेड मार्गावर धोकादायक खड्डे

दापोली : दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे दापोली शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दापोली-खेड महामार्गावरील एसटी स्टँडजवळ, न्यू गुडलक स्टोअरसमोर रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्याने गंभीर स्वरूप धारण केले असून, पावसाचे पाणी साचल्याने हा खड्डा आता अक्षरशः एका छोट्या तलावाचे रूप घेत आहे.

या ठिकाणी पाणी साचल्याने खड्ड्याची खोली आणि मर्यादा ओळखणे कठीण बनले. वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, कोणताही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परिणामी, या परिसरात वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, दापोली ते खेड महामार्ग हा नेहमीच मोठ्या वर्दळीचा रस्ता असल्याने आणि एसटी स्टँडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणाजवळच हा खड्डा असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवासी आणि नियमित वाहनचालकांनी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या धोकादायक खड्याकडे वेधले असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून या जीवघेण्या खड्ड्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 28/Oct/2025