Narayan Rane | खासदार नारायण राणे यांचा चिपळूणमध्ये आज जनता दरबार

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. जनता दरबाराचे आयोजन हे तीन टप्प्यांत असणार आहे. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून यासाठी या जनता दरबारचे आयोजन आहे. नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये उपस्थित राहवे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे २८ रोजी चिपळुणात येत आहेत. दुपारी १२ ते १.४५ वाजेपर्यंत खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रैंड येथे असणार आहेत. नंतर दुपारी २ वाजता चिपळूण बहादूरशेख नाका येथील चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार भवन येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही उपस्थिती असणार आहे. नंतर चिपळूण येथील भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नंतर सायंकाळी ६ वाजता खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रैंड येथे राखीव वेळ ठेवण्यात आली असून या हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 28/Oct/2025