Chiplun : चिपळूण पंचायत समिती परिसरात घाण आणि दुर्गंधी

चिपळूण : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात साचलेला कचरा आणि वाढलेले गवत यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांना या अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

तालुक्यातून शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांना कार्यालय परिसरातील या परिस्थितीमुळे त्रास सहन करावा लागतो. कार्यालयातील सतत बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. मागील काही महिन्यांपासून परिसरात स्वच्छता केली जात नसल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा महत्त्वाच्या सरकारी कार्यालयात दिवसा कोण उपाययोजना करतो? सफाई कामगार कुठे आहेत ? विशेष म्हणजे, चिपळूण शहर स्वच्छतेच्या मोहिमांमध्ये सक्रिय असून मोठमोठे कलाकार ब्रँड अँबेसिडर म्हणून सहभागी होत असले तरी, सरकारी कार्यालयातील अशा अस्वच्छतेमुळे शहराची प्रतिमा धोक्यात आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून परिसराची स्वच्छता राखावी, अन्यथा नागरिकांचा त्रास वाढेल आणि सरकारी संस्थांवरील विश्वास धोक्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 28/Oct/2025