Ratnagiri : काजरघाटी येथे बेकायदेशीरपणे मद्यपान करणाऱ्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या काजरघाटी धार येथे उघड्यावर बेकायदेशीरपणे मद्यपान करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमर प्रभाकर मुरकर (वय ३२, रा. कोकणनगर), प्रथमेश संतोष लाखण (वय २९), तुषार संतोष लाखण (वय २४, दोघेही रा. कारवांची वाडी), प्रसाद शंकर बंडबे (वय २४, रा. शांतीनगर) यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

अशा मद्यपींविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून रोजच्यारोज या संदर्भातील कारवाया होत आहेत. गेल्या रविवारी काजरघाटी येथे सार्वजनिक स्थळी ४ तरुण मद्यपान करत असताना आढळून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 28/Oct/2025