रत्नागिरी : जमीन विकत देण्याच्या व्यवहाराच्या टोकन रकमेसह खरेदी खत नोंदणी आणि इतर खर्चाची रक्कम घेऊनही खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जमीन मालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिभा दिनेश देशमुख (४८ रा. बोडींग रोड, माळनाका) यांच्या तक्रारीनुसार पोमेंडी गावातील जमीन मालक सुरेश काळ्या पवार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या व्यवहारातून १ लाख २० हजारांची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
जमीन विक्री व्यवहारांच्या माध्यमातून तक्रारदार प्रतिभा देशमुख आणि आरोपी सुरेश पवार यांची ओळख झाली. या आरोपीने आपल्या १० गुंठे जमीनीचा व्यवहार करायचे असल्याचे सांगितले. डजोड करुन ही जमिन ९ लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याची प्रतिभा पवार यांनी तयारी दर्शवली. इतर कोणालाही ही जमीन विकली जाऊ नये यासाठी आरोपीने टोकन रक्कम २० हजार रुपयांसह खरेदीखत नोंदणी रकमेपोटी ६० हजार रुपये व जागेला संरक्षण भिंत घालण्यासह डुरा बुजविण्यासाठी ६० हजार रुपये मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 28/Oct/2025












