रत्नागिरी : कार्तिकी वारीला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपूरला जातात. वारकरी, भाविकांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी आगारातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १३५ बसचे बुकींग झालेले आहे. आणखी बुकींग वाढण्याची शक्यता आहे. १५० हुन अधिक एसटी बसेस बुक होण्याची शक्यता आहे. २८ नोव्हेंबरपासून बसेस रत्नागिरीहुन पंढरपूरकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.
आषाढी वारीनंतर पंढरपुरात होणाऱ्या कार्तिक वारीला मोठे महत्व आहे. यंदाच्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी होणार आहे. यावारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटकातून लाखो भाविक लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होत असतात. लाडक्या विठुरायचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी, भक्त पंढरपुरात जात असल्यामुळे एसटी विभाग नेहमीच जादा गाड्या सोडत असते. रत्नागिरी जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात लाडक्या विठूरायच्या दर्शनाला जात असतात यंदाच्या वर्षी रत्नागिरी एस आगारात बुकींगला सुरूवात झाले आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून १३५ हुन अधिक गाड्यांचे बुकींग झाले आहे. आणखी बुकींग वाढण्याची शक्यता आहे. येत्या २८ नोव्हेंबरपासून टप्प्या टप्प्याने एसटी बसेस पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. वारीनंतर ३ नोव्हेंबरपासून पंढरपूरातून एसटी बसेस रत्नागिरीला येणार आहेत.
राज्यातून ११५० जादा बसेसचे नियोजन
पंढरपुरात होणाऱ्या कार्तिक वारीसाठी ११५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वता आज सोमवारी पंढरपूरला भेट देवून एसटी बसेसचा आढावा घेतला. त्यांच्या सूचनेनुसार कार्तिकी वारीसाठी ११५० हून अधिक जादा एसटी बसेस सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे ककोकणासह राज्यातील लाखो भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
या आगारातून झाले आरक्षण
कार्तिकी वारीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्यावतीने एसटी बुकींगला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत १३५ गाड्यांचे बुकींग झाले आहे. यात लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, देवरूख, खेड, दापोली आगारातून जास्त बुकींग झाल्या आहेत.
कार्तिकवारीसाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने वारकरी, भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. एसटी बुकींग सुरू झालेली असून आतापर्यंत १३५ हुन अधिक एसटी बसेसचे बुकींग झालेले आहे. बुकींगला चांगला प्रतिसाद मिळत असून आणखी दहा ते १५ बसेस बुक होतील. २८ ऑक्टोबरपासून एसटी बसेसपंढरपूरकडे रवाना होतील. गतवर्षी १५५ एसटी बसेस सोडल्या होत्या-प्रज्ञेश बोरसे, विभागीय नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 pm 28/Oct/2025














